सध्या कोल्हापूर शहरातील हॉस्पिटल मध्ये तसेच कोविड सेंटर मध्ये दुर्दैवाने मरण पावलेल्या रुग्णांवर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. या मध्ये संपूर्ण जिल्हा तसेच बाहेरील रुग्णाचे मृतदेह सुद्धा असतात. कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ज्यादा शेणी लागतात. या शेणी विकत विकत घ्यायचे म्हटले तरीसुद्धा जे शेणी पुरवठादार आहेत त्यांच्याकडून त्या प्रमाणात शेणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे
कोल्हापूर दक्षिणमधून लोकसहभागातून एक लाख शेणी पंचगंगा स्मशानभूमीसाठी देण्याचे नियोजन केले आहे माणुसकीच्या नात्याने आपणा सर्वांच्या सहकार्याने आपण शेणी गोळा करुन पंचगंगा स्मशानभूमीला देणे ही काळाची गरज आहे.
तरी आपण सर्वजण मिळून आपापल्या गावातील सर्व संस्था आणि तरुण मंडळे, महिला बचतगट यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त शेणी गोळा करून त्या स्मशानभूमीला देऊन सामाजिक बांधिलकी जपूया.
- आ. ऋतुराज पाटील
Comentarios