Search

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांची मराठवाडा, विदर्भ भागातील काही मुकादमांकडून फसवणूक केली ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांची मराठवाडा, विदर्भ भागातील काही मुकादमांकडून फसवणूक केली जात असल्याची तक्रार माझ्याकडे जिल्ह्यातील शेतकरी व ऊस वाहतूक बांधवांनी केली होती. मराठवाडा, विदर्भ येथील ऊसतोड कामगार मोठया प्रमाणात कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यामध्ये ऊस तोड करण्यासाठी येत असतात. हे ऊसतोड कामगार काही मुकादमांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणीसाठी येतात. परुंतु, गेल्या काही वर्षांपासून ऊस तोडणीसाठी मजुरांचा पुरवठा करतो असे आश्वासन देऊन कोल्हापुरातील ऊस वाहतूकदाराची विदर्भ, मराठवाडा येथील मुकादमाकडून लाखो रुपयांची फसवणूक करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांच्या शिष्टमंडळासोबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची विनंती केली.

यावेळी, एस.वाय.किल्लेदार, मारुती पाटील, अविनाश पाटील, दिगंबर पाटील, अनिल माने, युवराज पाटील, अमित पाटील, बाबासो गोते, नितीन सूर्यवंशी हे उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments