Search
  • Nilesh Patil

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हयातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळा

आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हयातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हाध्यक्ष नामदार सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाचे लक्षणीय सदस्य विजयी झाले आहेत.

आज पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेबांनी जिल्ह्यातून आलेल्या १ हजार हुन अधिक ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करून आगामी काळात गावच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कशा पद्धतीने योग्य नियोजन करून काम करता येईल याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक फार महत्वाची व अवघड असते. पंचायतराज मध्ये महत्वाची मानली जाणारी हि निवडणूक जिंकत सामाजिक कार्य करण्यासाठी मिळालेल्या या संधीचे सोनं करण्याचे यावेळी या सदस्यांशी संवाद साधतांना सांगितले.

आजच्या या सोहळ्यामुळे या सर्व सदस्यांना प्रोत्साहन मिळाले असून सर्वच सदस्य येणाऱ्या पाच वर्षात गावाच्या विकासासाठी मन लावून काम करतील. या सर्व सदस्यांमध्ये युवक सदस्यांचा वाढत आलेख पाहता गावाच्या विकासासाठी या युवक-युवतींची नवसंकल्पनांची जोड नक्कीच मिळणार आहे.

यावेळी या सर्वांचा सत्कार पालकमंत्री ना. सतेज पाटील साहेब, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, आमदार चंद्रकांत जाधव, आ. राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, माजी महापौर निलोफर आजरेकर , जि. प.अध्यक्ष बजरंग पाटील, करवीर सभापती अश्विनी धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, उपमहापौर, नगरसेवक, नगरसेविका, तालुका अध्यक्ष, यांच्यासह जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments

START CHANGING

चला उठा ... महाराष्ट्र घडवूया 

2126 E, “Ajinkyatara”, Tarabai Park, Kolhapur, 

State - Maharashtra,

Country - India.

Pincode - 416003.

ruturaj@dypgroup.org

97644 95999