कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्षणे नसणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांनासुद्धा महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याच्या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे जी यांना पत्राद्वारे विनंती केली.
कोरोनाच्या संकट काळात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाधित रुग्णांसाठी शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परंतु, बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी या योजनेमध्ये समाविष्ट व्होऊ इच्छिणाऱ्या कोल्हापुरातील ज्यादा 22 रुग्णालयांना परवानगी देण्याची मागणीसुद्धा या पत्रामध्ये करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 47 शासकीय व खाजगी रुग्णालये ही महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट आहेत. त्यापैकी 13 रुग्णालयांमध्ये कोरोनाबाबतचे उपचार केले जात आहेत. यामधील उर्वरीत इतर रुग्णालयांना काही अटी शिथिल करून कोरोनावर उपचार करण्याबद्दल सुविधा देणेबाबत निर्देश देण्याबाबतही विनंती केली आहे.
- आ. ऋतुराज पाटील
Comments