Search

केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी विषयक काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी....

केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी विषयक काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आदरणीय खा. राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरु केली आहे.

याच मोहिमेचा एक भाग म्हणून प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या राज्यव्यापी व्हर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीमध्ये माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाणजी व कृषी राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम जी आणि पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील जी यांच्या समवेत कोल्हापूरहून सहभागी झालो.

शेतकरी व कामगारांना देशोधडीला लावणारे हे कायदे मागे घेऊ पर्यंत आमचा हा लढा असाच चालू राहणार आहे.

- आ. ऋतुराज पाटील3 views0 comments