top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

कोणत्याही विकास कामांमध्ये लोकांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा घटक असतो. आजवर लोकसह्भातून अनेक समाजप...

कोणत्याही विकास कामांमध्ये लोकांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा घटक असतो. आजवर लोकसह्भातून अनेक समाजपयोगी गोष्टी तयार झालेल्या आपल्याला पाहावयाला मिळाला. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कळंबा येथील अयोध्या कॉलोनी (रणनवरे कॉलोनी) येथील जेष्ठ नागरिकांनी लोकवर्गणीतून आणि पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी.पाटील साहेबांच्या सहकार्यातून उत्कृष्ट अशी बाग विकसित केली आहे. आज या बागेचे उदघाटन करतांना मला आनंद होत आहे. या उदघाटन वेळी या कॉलोनीतील नागरिकांसाठी आवश्यक सभागृहाची लवकरच उभारणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच, भागातील जेष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन या बागेची उभारणी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

यावेळी, पांडुरंग चौगले, सीताराम पोवार, विलास काजवे, दिनकर कुंभार, वामन मेहतर, डॉ. कावडे, धीरज पाटील, राहुल पटोळे, विक्रम पाटील, राहुल काजवे, सौ. नयना काजवे, सुनील रसाळे, अभिजीत खतकर, सचिन परीट तसेच भागातील नागरिक उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील



5 views0 comments

Comments


bottom of page