कसबा बावडा येथील मतदार नोंदणी शिबिराला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी तसेच नाव नोंदणी करण्यासाठी...
- Nilesh Patil
- Feb 1, 2021
- 1 min read
भारत देशातील राज्यघटनेने आपल्या सर्वांना सर्वांत मोठा हक्क दिला आहे, तो म्हणजेच 'मतदानाचा' लोकशाही व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी ते आपले कर्तव्य देखील आहे. मतदानाचे कर्तव्य बजावने हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्यच आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवणे महत्वाचे आहे. आज कसबा बावडा येथील मतदार नोंदणी शिबिराला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी तसेच नाव नोंदणी करण्यासाठी आलेल्या माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींशी संवाद साधला. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना विनंती आहे, आपणही आपले नाव नोंदवा आणि आपल्या लोकशाहीला बळकट करा.
- आ. ऋतुराज पाटील
Comments