पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्यापासून कसबा बावड्यातील नगरसेवक व श्रीराम सोसायटीचे संचालक यांच्यासोबत बावड्यामध्ये कोरोना सेंटर उभे करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो.
कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, रोटरी मूव्हमेंटआणि कसबा बावडा केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने आज पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील यांच्या शुभहस्ते आज या सुसज्ज कोरोना सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.
नुकताच मी कोरोनावर मात करून आलो आहे ,पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरीच विलगिकरानात असल्याने आज या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही.
याप्रसंगी महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, रोटरीचे गव्हर्नर संग्राम पाटील, सूर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर, श्रीकांत झेंडे, श्रीराम सोसायटीचे सभापती धनाजी गोडसे व संचालक तसेच नगरसेवक सुभाष बुचडे, डॉ. संदीप नेजदार, मोहन सालपे, अशोक जाधव, श्रावण फडतारे, माधुरी लाड, स्वाती यवलुजे यांच्यासह कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी, कसबा बावड्यातील डॉक्टर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments