top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

कसबा बावडा आणि लाइन बाजार भागातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता श्रीराम सेवा संस्थेच्या...

Updated: May 31, 2021

कसबा बावडा आणि लाइन बाजार भागातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता श्रीराम सेवा संस्थेच्या हॉलमध्ये संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असून आज यासंदर्भात त्यांनी महानगरपालिकेचे अधिकारी आणि कसबा बावडा येथील कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

कसबा बावडा येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार पॅव्हेलीयन मैदानावरील बॅडमिंटन हॉलमध्ये महानगरपालिकेच्या वतीने कोवीड सेंटर सुरू आहे. पण या सेंटर मध्ये मध्ये शहर तसेच परिसरातील रुग्ण येत असल्याने हे सेंटर मध्ये बेड शिल्लक राहत नाहीत. त्याचबरोबर या उपनगर ची लोकसंख्या जास्त आहे.

सध्या सौम्य लक्षणे असणारे कोविड रुग्ण गृह अलगिकरणात राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण सर्वांचेच घरामध्ये या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. असा रुग्ण घरी राहिला तर घरातील इतर लोकांना सुद्धा संसर्ग होण्याचा संभव असतो .

ही परिस्थिती लक्षात घेऊन ना.सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थात्मक अलगीकरण केंद्रासाठी पुढाकार घेतला आहे. श्रीराम सेवा संस्थेच्या हॉल मध्ये यासाठी जागा उपलब्ध आहे. याठिकाणी बेडची व्यवस्था करून महापालिकेच्यावतीने डॉक्टर नर्सेस तसेच औषधेही पुरवली जाणार आहेत. कसबा बावडा येथील डॉक्टर सुद्धा स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सेवा देणार आहेत. डॉ. डी वाय पाटील ग्रुपच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत या सेंटरसाठी करण्यात येणार आहे.

या बैठकीवेळी महापालिकेचे उपायुक्त निखील मोरे, श्रीराम संस्थेचे सभापती धनाजी गोडसे, उपसभापती संतोष ठाणेकर, माजी नगरसेवक मोहन सालपे , डॉ. संदीप नेजदार,संजय लाड ,सामाजिक कार्यकर्ते गजानन बेडेकर,प्रशांत पाटील, चेतन काळे, प्रविण लाड, राजीव चव्हाण, विलास पिंगळे, प्रमोद पाटील ,आनंदा करपे यांच्यासह श्रीराम सेवा संस्थेचे संचालक आणि बावड्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.3 views0 comments

댓글


bottom of page