स्तुत्य उपक्रम!
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कणेरीवाडी गावातील कु. पवन सदाशिव वाठारकर यांना गावातील लोकप्रतिनिधी आणि लोकवर्गणीतून दुचाकी भेट म्हणून देण्यात आली.
गावातील कोणत्याही अडचणीच्यावेळी, ग्रामस्थांच्या संकटसमयी धावून जाऊन त्यांना सर्वोतोपरी मदत करणारा होतकरू मुलगा म्हणजे पवन. घराची बेताची परिस्थिती असली तरी सतत हसतमुख राहून गावातील नागरिकांना पवन अगदी मनापासून मदत करतो. आर. पी. ग्रुपच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे मी त्याला पाहतोय, गावातील कित्येकांच्या अडचणीच्यावेळी त्याने मला फोन करून माझ्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून दिली आहे. गावातील अश्या होतकरू आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या कामाला उभारी देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून त्याला दुचाकी भेट म्हणून दिली आहे.
यावेळी, पवनचे आजवरचे काम पाहून त्याला माझ्याकडून लागेल ती मदत करण्याचा मी शब्द दिला आहे. पवन सारख्या होतकरू युवकांच्या पाठीमागे फक्त खंबीरपणे उभे राहून त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे.
यावेळी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, प्रकाश खोत, भिकाजी चव्हाण, विनोद खोत, संजय खोत, संदीप शेळके, संदीप खोत, सतीश शेळके, विनय खोत,राजू मोरे, बाजीराव खोत, शकील शेख, समाधान सोनावणे, तानाजी मोरे, हिंदुराव कदम, पांडुरंग खोत, संतोष कांबळे, दिलीप थोरात आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments