आज राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री ना.विजय वडेट्टीवार जी यांच्यासोबत कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळास आणि समाधीस्थळास भेट देऊन राजर्षींच्या प्रतिमेस व पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी, महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, गुलाबराव घोरपडे, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेवक मोहन सालपे, नगरसेवक सुभाष बुचडे, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव व नगरसेवक तौफिक मुल्लाणी, संजय लाड, यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments