आज कळंबा गावातील विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, गावातील संत सेना महाराज हॉल तसेच निकम गल्ली, राम गल्ली, मिरजे गल्ली, महालक्ष्मी गल्लीतील अंतर्गत रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच, गावातील पाणंद रस्त्याची यावेळी पाहणी केली.
या उदघाटन प्रसंगी, सरपंच सागर भोगम, उपसरपंच रोहित मिरजे, शंकरराव हळदे, बाबासो चौगुले, माजी सभापती पं.स. दिलीप टिपुगडे, पं.स. सदस्य मीनाक्षी पाटील, आशा टिपुगडे, सोमनाथ शिंदे, शिवाजी कांबळे, सुधीर पाटील, विश्वास गुरुव, भाववान तिवले, सुरेश टिपुगडे, यशवंत शिंदे, उदय जाधव, कविता टिपुगडे, सुहास जंगम, संग्राम चौगुले, अरुण पाटील, निवास टिपुगडे, कृष्णात जंगम, सुरेश मर्दाने तसेच ग्रामपंचायत सदस्य, सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments